1 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 जानेवारी 2020)
मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव :
- दिल्लीमधील प्रगती मेट्रो स्टेशन यापुढे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन या नावाने ओळखलं जाणार आहे. दिल्ली सरकारने प्रगती मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान यासंबंधी घोषणा केली. यावेळी त्यांनी नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसंच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती दिली.
- तर मनिष सिसोदिया यांनी यावेळी मुबारक चौकाला शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
नवी दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद :
- भारतीय संसदेची नवीन इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे. नवीन इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे. या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.
- तर याशिवाय पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.
- तसेच याच वर्षी 13 सप्टेंबर रोजी शहरी विकास मंत्रालयलाने पंतप्रधानांच्या घरासंबंधीच्या या प्रकल्पाची घोषणा केली केली आहे. हे घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदाही मागवण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये गुजरातमधील एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमीटेडची निविदेला सरकारने पसंती दर्शवली.
- सर्व कंपन्यांना मागे टाकत गुजरातमधील डॉ. बिमल पटेल यांच्या या कंपनीने हे कंत्राट मिळवले आहे.
- 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. या योजनेशी संबंधित एका सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला संग्रहालयामध्ये रुपांतरीत करण्याचा सरकारचा विचार आहे.
जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धात हम्पीला अतिजलद प्रकारात 12वे स्थान :
- अखेरच्या तीन डावांत पराभव पत्करल्यामुळे जलद (रॅपिड) प्रकारातील विश्वविजेतेपदानंतर अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारातील जगज्जेतेपद पटकावण्यात भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अपयश आले. दोन दिवसांच्या जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- अतिजलद प्रकारात महिलांमध्ये रशियाच्या कॅटरिना लॅग्नोने आणि पुरुषांमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
- तर शनिवारी चीनच्या लेई टिंगजीला आर्मागेडॉन डावात पराभूत करून हम्पीने जागतिक महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर अतिजलद प्रकारात पहिल्या दिवशी हम्पीने दिमाखदार कामगिरी करीत नऊपैकी सात गुण मिळवून दुसरे स्थान राखले होते; परंतु दुसऱ्या दिवशी हे सातत्य तिला राखता आले नाही.
- तसेच 17 डावांपैकी तिच्या खात्यावर 10.5 गुण जमा होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या द्रोणावल्ली हरिकाला 25वे स्थान मिळाले.
अंबानींकडून जिओ मार्ट लाँच :
- रिलायन्स उद्योग समूहानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करत जिओ मार्टचं सॉफ्ट लाँच केले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दबदबा असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशी जिओ मार्टची थेट स्पर्धा होणार आहे.
- मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण भागात प्रथम जिओ मार्ट सुरू करण्यात येणार असून, ‘देश की नई दुकान’, अशी त्याची टॅगलाइन आहे. 12 ऑगस्ट 2019ला रिलायन्सनं जिओ मार्ट सुरू करण्याची चाचपणी सुरू केली होती.
- जिओ मार्टच्या ग्राहकांना 50 हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच दिली जाणार असून, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
- जिओ मार्टची सेवा आम्ही सुरू केली असून, जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आजचा दिनविशेष:
- सन 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सन 1842 मध्ये सुरू झाले. - महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
- 1 जानेवारी 1862 पासून इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
- विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सत्येंद्रनाथ बोस‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला होता.
- सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
- भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक ‘कमलाकांत वामन केळकर‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1902 मध्ये झाला होता.
- 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
Must Read (उद्याचा अंक नक्की वाचा):
चालू घडामोडी (2 जानेवारी 2020)


0 Comments