16 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 जानेवारी 2020)
गोल्डन ग्लोब पुरस्कार
जेकिन फीनिक्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- १९१७’ चित्रपट ठरला सर्वोत्तम अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार पार पडला आहे.
- या सोहळय़ात ‘१९१७’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.
- ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
अमेरिकेत शिखांची स्वतंत्र जनगणना
- अमेरिकेत प्रथमच शिखांची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून जनगणना होणार आहे. यंदा (२०२० साली) अमेरिकेत होणाऱ्या जनगणनेवेळी शीख धर्मीयांची स्वतंत्ररीत्या गणना करण्यात येणार असल्याची माहिती, येथील अल्पसंख्याक संघटनेने दिली.
- सॅन डियागो येथील शीख संघटनेचे अध्यक्ष बलजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाची स्वतंत्ररीत्या जनगणना व्हावी यासाठी आम्ही बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो.
- अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा बैठका घेण्यात आल्या. त्याचे फळ आज मिळाले आहे. या निर्णयाचा केवळ शीख धर्मीयांनाच नव्हे, तर अमेरिकेतील सर्व अल्पसंख्याक समुदायांना पुढच्या काळात फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
- अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समुदायाची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून गणना होत असून, त्यांना विशिष्ट प्रकारचा संकेतांक (कोड) दिला जाणार आहे. या संकेतांकामुळे स्वतंत्ररीत्या गणना करताना अधिक पारदर्शकता आणि अचूकता राहील, अशी माहिती अमेरिकेतील जनगणना कार्यालयाचे उप-संचालक रॉन जर्मिन यांनी दिली.
एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- काँग्रेसप्रणीत यूपीए १सरकारच्या काळात करण्यात आलेला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदा घटनाबाह्य़ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
- या कायद्यामुळे राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊन केंद्राला अनिर्बंध अधिकार मिळतात असा दावा याचिकेत केला आहे.
- केरळ सरकारने नागरिकत्व कायद्याला आव्हान दिले होते त्यानंतर आता एनआयए कायद्याला छत्तीसगड सरकारने आव्हान दिले आहे. मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता. त्या वेळी काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे गृहमंत्री होते. या कायद्यानुसार एनआयएच्या पथकांना राज्यांची परवानगी न घेता कुठेही जाऊन छापे टाकणे व चौकशी करणे असे अधिकार देण्यात आले आहेत.
- छत्तीसगड सरकारने कलम १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, एनआयए कायद्याने राज्यघटनेतील तत्त्वांचा भंग झाला असून असा कायदे करणे संसदेच्याही कार्यकक्षेत नाही.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम
- विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला.
- सर्वाधिक १११ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे. याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता.
- जो १५ वर्षांपासून अबाधित होता. कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे.
- या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.
घटनादुरुस्तीच्या प्रस्तावामुळे रशिया सरकार विसर्जित
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी घटनादुरुस्ती करण्याची घोषणा केली. त्यामुळे रशिया सरकार विसर्जित करण्यात आले असून, पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांचा राजीनामा पुतिन यांनी मंजूर केला.
- अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२४ मध्ये समाप्त झाल्यानंतरही सत्तासूत्रे आपल्याकडेच राहतील, याची तजवीज पुतिन यांनी केल्याचे मानले जाते.
- रशिया सरकारच्या संरचनेत बदल करण्याच्या अध्यक्ष पुतिन यांच्या प्रस्तावामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा दिमित्री मेदवेदेव यांनी केली.
- पुतिन यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांची अध्यक्षीय सुरक्षा परिषदेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यानंतर मिखाईल मिशुस्टीन यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आहे.
व्हिडीओ केवायसी करणारा भारत जगातील एकमेव देश
- मोबाइल व्हिडीओ संवादाद्वारे ‘नो युवर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रिया राबविण्यास बँका व फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमांत बदल केले आहेत.
- तर आधार व इतर ई-दस्तावेजांआधारे ई-केवायसी व डिजिटल केवायसी राबविण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
- सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेने केवायसीविषयक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे भारत व्हिडीओ केवायसीची परवानगी असलेला जगातील एकमेव देश ठरला आहे.
- बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.
- बिगर-बँक संस्थांना ई-केवायसीची परवानगी नाही. मात्र, प्रत्यक्ष आधार व क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना केवायसी प्रक्रिया राबविता येईल. आधारद्वारे ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यास कोर्टाने मनाई केल्यानंतर नवीन ग्राहक जोडणे मोबाइल वॉलेट कंपन्यांना कठीण झाले होते.
- आरबीआयने म्हटले की, डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो घेणे व आधार असल्याचा वैध अधिकृत पुरावा घेणे. जिथे ऑफलाइन पडताळणी शक्य नाही, तिथे व्हिडीओ केवायसी राबविता येईल. अधिकृत अधिकारी लाइव्ह फोटो घेतील. जेथे फोटो घेतला, त्या स्थानाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेतली जाईल.
आजचा दिनविशेष
१८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.
१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.
१९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)
१९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
१९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
१९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
२०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.

१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.१९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.
१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण

आपण वरील माहिती खालील माध्यमातून नक्की पाठवा.

0 Comments