8 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 जानेवारी 2020)
आजचा दिनविशेष
- सन 1828 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ डेमोक्रॅटिक पार्टी सुरु झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 मध्ये झाला होता.
- राजस्थान विद्यापीठाची स्थापना सन 1947 मध्ये झाली.
- सन 2000 मध्ये लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- भारत व व्हिएतनाम दरम्यान सन 2001 मध्ये सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
अंतराळवीरांसाठीचा मेन्यू तयार
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाची मोहीम असलेल्या ‘मिशन गगनयान’साठीची तयारी सुरू झाली आहे.
तर या मोहिमेतंर्गत डिसेंबर 2022 पर्यंत अंतराळवीर अवकाशात जाणार आहे
- तसेच त्याच्यासाठीच्या जेवणाचा मेन्यू तयार झाला आहे. मैसूर येथील संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेत हे जेवण तयार करण्यात आलं आहे.
- केंद्र सरकारने मिशन गगनयानला मंजूरी दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी दिली होती. या अवकाश मोहिमेबद्दल बोलताना सिवन म्हणाले होते, की या मोहिमेत चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून, डिसेंबर 2022पर्यंत गगनयान अवकाशात जाईल.
विराटकडून पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद
- कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020 वर्षात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
- इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने लंकेवर 7 गडी राखून मात केली.
- तर या विजयासह मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे, पहिला सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे वाया गेला होता. भारताकडून लोकेश राहुलने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने चांगली साथ दिली.
- विराटने वर्षाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज सुरुवात करत अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत.
- तसेच एक धाव काढत विराटने रोहित शर्माला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज हा बहुमान मिळवला. याचसोबत कर्णधार या नात्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटने 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
- तर 30 डावांमध्ये ही कामगिरी पूर्ण करताना विराटने फाफ डु प्लेसिस आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी :
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे.
- हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे.
- तर हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर 3-2 ने मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.
- तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा मानला जात होता.
भारतीय वंशाच्या दोन महिला अमेरिकेत न्यायाधीश
- न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासिनो यांनी भारतीय वंशाच्या दोन महिलांची फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
- न्यायाधीश अर्चना राव यांना फौजदारी न्यायालयात आणि न्यायाधीश दीपा अंबेकर यांना दिवाणी न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे.
- तर राव यांना यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्यूयॉर्क काऊंटी जिल्हा अॅटर्नी कार्यालयात त्या 17 वर्षांपासून सेवा देत आहेत.
- अंबेकर यांना मे 2018 मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. महापौरांनी कौटुंबिक न्यायालय, फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालयात 28 नियुक्त्या केल्या आहेत.
जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ
- जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलला मुंबईत सोमवारी प्रारंभ झाला. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस हा कार्निव्हल भर समुद्र्रात रंगणार आहे.
- मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते या कार्निव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलेश क्रुझचे सल्लागार राजीव दुग्गल, ज्वेल ट्रेंड्जचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गोविंद वर्मा उपस्थित होते.
- तर या कार्निव्हलमध्ये देशातील साठ कंपन्यांनी सहभाग घेतला असून, भारतासह इतर आठ देशांतील साडेतीनशे रिटेल व्यापारी या कार्निव्हलला उपस्थित आहेत.
पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान
- किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून विविध पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने आयोजित 14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला.
- अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते डॉ. देब यांना पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन या सन्मानाने गौरविण्यात आले.
- तर यावेळी एन्ड्रीएस एवल्स दिग्दर्शित ‘द पायथन कोड’ हा समारोपाचा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच या महोत्सवानिमित्त आयोजित किर्लोस्कर जी.सी.सी. ट्रॉफी, पथनाट्य स्पर्धा, प्रश्न मंजूषा स्पर्धा, रामनदी फोटो वॉक आणि रामनदी युवा संसद अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
‘या’ देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम
- फिनलंडच्या नव्या पंतप्रधान सना मरीन यांनी एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार, आता देशातील सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस, सहा तासांसाठी काम करावे लागणार आहे.
- तसेच, या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. या निर्णयामुळे देशातील कर्मचारी वर्ग हा आपल्या कुटुंबीयांसोबत जास्त काळ राहू शकेल, असे पंतप्रधान सना मरीन यांचे मत आहे.
- सामान्यरित्या फिनलंडमध्ये लोक आठवड्यामध्ये पाच दिवस, 8 तासांसाठी काम करतात. तर फिनलंडच्या शेजारी असलेल्या स्वीडन देशात 2015 मध्ये 6 तास काम करण्याची पॉलिसी तयार करण्यात आली होती. यानंतर स्विडनमधील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. आधी काहीकाळ मायक्रोसॉफ्टने, जपान आणि
युकेच्या एक कंपनी पॉर्टकुलिस लीगलने सुद्धा आठवड्यात तीन दिवस सुट्टी देण्याची पॉलिसी तयार केली होती. यानंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले आणि कामाच्या गुणवत्तेत सुद्धा वाढ झाली होती.
0 Comments