18 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 जानेवारी 2020)
आनंद प्रकाश माहेश्वरी
यांची CRPF
महासंचालक पदी नियुक्ती
- आनंद प्रकाश माहेश्वरी हे उत्तरप्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी होते.
- CRPF चे माजी प्रमुख (Director General - DG) राजीव राय भटनागर यांच्या निवृत्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
- CRPF चे विस्तारित रूप म्हणजेच Central Reserve Police Force
- CRPF ची स्थापना - २७ जुलै १९३९
- CRPF चे ब्रीदवाक्य - सेवा आणि निष्ठा (Service and Loyalty)
भारतीय अवकाश
संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) चे प्रक्षेपण
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
- जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.
- यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-४ ए ऐवजी आता जीसॅट-३० हा उपग्रह काम करणार आहे.
- GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. यापूर्वी इनसॅट-४ ए हा उपग्रह २००५ मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
- या व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवाआदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे.
- 2020 मध्ये भारताकडून एकूण १० उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल१ उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला २०२०पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी ६ लॉन्च वाहन आणि ७ सॅटेलाइट लॉन्च केले होते.
सुधारित
नागरिकत्व कायद्या विरोधात पंजाब विधानसभेत ठराव
- नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव पंजाब विधानसभेने तीन तासांच्या चर्चेअंती मंजूर केला आहे. तर शुक्रवारी हा कायदा रद्द करण्याची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला, असा ठराव करणारे केरळ नंतर पंजाब हे दुसरे राज्य ठरले आहे.
- राज्याचे मंत्री ब्रह्मा मोहिंद्रा यांनी विशेष विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी हा ठराव सादर केला होता.
- आम आदमी पक्ष व काँग्रेस यांनी ठरावाला पाठिंबा दिला तर शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व देण्यात येणाऱ्या समुदायात मुस्लिमांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
ईश्वर शर्मा ‘ग्लोबल
चाइल्ड प्रॉडीजी अॅवॉर्ड’ विजेता
- योगकर्ता मुलगा ईश्वर शर्मा हा भारतीय आहे. (१० वर्षे वय)
- पुरस्कारासाठी युनायटेड किंगडममधून निवड याची निवड कर्मात आली.
- या आवर्ड कार्यक्रमात ४५ देशांतील बालकलाकारांचा सन्मान मारण्यात आला.
- ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार हे बाल कलाकारांच्या जागतिक प्रतिभा ओळखीसाठी प्रदान करते.
नवी दिल्लीत इंडियन
हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ प्रदर्शनी
- 15 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या नावाने महिनाभर चालणार्या एका विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
- येथे हंपी आणि वाराणसीचे काशीविश्वनाथ मंदिर, ताजमहाल, कोणार्कचे सूर्य मंदिर, हंपीचे रामचंद्र मंदिर, आणि पाटणचे राणी की वाव या आश्चर्यजनक वास्तूंची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
खेलो इंडिया
युवा क्रीडा स्पर्धात जलतरणात तीन सुवर्णपदके
- महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली.
- अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
- महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने 50 मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली.
- मुलींमध्ये करिना शांताने 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने 200 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले.
- जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले.
टाटा स्टील
बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम
- विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला.
- सर्वाधिक १११ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे. याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता.
- जो १५ वर्षांपासून अबाधित होता. कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.
१८ व्या पुणे
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात : आनंदी गोपाळ ठरला
सर्वोत्कृष्ट चित्रपट
- पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित, आनंदी गोपाळ या चित्रपटाने बाजी मारली आहे.
- या चित्रपटाला गुरुवारी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ट्युनिशियाच्या 'अ - सन' या चित्रपटाने प्रथम येण्याचा मान मिळवून प्रभात आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट म्हणूनही या चित्रपटाने मान मिळवला.
- नऊ जानेवारीपासून सुरू असलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता गुरुवारी झाली.
- महोत्सवादरम्यान विविध देशांमधून आलेल्या ज्युरींनी १९१ चित्रपटांचे परीक्षण करून विजेते घोषित केले
जगातील
सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू
- चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती. तर हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली. हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.
- तसेच चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात. मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे.
- तर हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे. 2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती. हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे. प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे. याचा वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.
- चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 GB माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे. फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.
कर्नाटक राज्याने
सुरू केली - 'जल अमृत योजना'
- जलाशयांच्या संरक्षणार्थ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारी 'जल अमृत' योजना कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली आहे.
- राजस्थाननंतर कर्नाटकमध्ये देशाचा सर्वात मोठा दुष्काळप्रणव भूभाग आहे.
- या योजनेचे चार घटक आहेत, ते आहेत – जलाशयांचे पुनरुत्थान, नवीन जलाशये, वॉटरशेड प्रकल्प व वनीकरण.
आपण वरील माहिती
खाली माध्यमातून नक्की शेयर करा.


0 Comments